कझाकिस्तान येथे विमान धावपट्टीवर कोसळून ४२ जणांचा मृत्यू

कझाकिस्तान येथे  विमान धावपट्टीवर कोसळून ४२ जणांचा मृत्यू

अस्ताना: कझाकिस्तान येथे  अझरबैजान एअरलाईन्सचं विमान धावपट्टीवर उतरत असताना जमिनीवर कोसळून ४२ जणांचा मृत्यू झाला. एअरलाईन्सचं एम्ब्रेयर इ १९० ए आर 190 विमान बाकूहून रशियाच्या चेचेन्याला जात होतं. या विमानात ६७ जण होते. दुर्घटनेतून २५ जण बचावले आहेत. विमान अचानक  कित्येक फूट खाली आलं आणि जमिनीवर कोसळताच त्यानं पेट घेतला. विमानाचे दोन तुकडे झाले.

 बचाव पथकानं विमानातील जखमी प्रवाशांची सुटका केली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातस्थळापासून दूरपर्यंत प्रवाशांचे मृतदेह पसरले होते. 

विमानानं अपघातापूर्वी विमानतळाच्या भोवती एक चक्कर टाकली. त्यानंतर ते अचानक खाली कोसळलं.  काही सेकंदांमध्ये विमान कित्येक फूट खाली आलं. या विमानाने बाकूहून स्थानिक वेळेनुसार काल संध्याकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी उड्डाण केलं. ५७ मिनिटांनी ते चेचेन्याच्या ग्रोन्जी विमानतळावर उतरणं अपेक्षित होतं. पण विमानानं उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच त्याला पक्षानं धडक दिली. त्यानंतर विमान २ तास ३३ मिनिटं हवेत होतं. फ्लाईट ट्रॅकिंग साईट फ्लाईटरडार२४ नुसार वैमानिकानं एक तास विमान उंचावर नेण्याचा प्रयत्न केला.