कळंबा उपसरपंचपदी पूनम जाधव यांची निवड

कळंबा उपसरपंचपदी पूनम जाधव यांची निवड

कळंबा : सतरा सदस्य असणाऱ्या कळंबा ग्रामपंचायतीवर आमदार सतेज पाटील गटाची सत्ता आहे. यशवंतग्राम निर्मल ग्राम पुरस्कार विजेत्या कळंबा गावच्या उपसरपंचपदी पूनम उत्तम जाधव यांची बिनविरोध निवड झाली. संदीप पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्तपदी ही निवड केली. 

मंगळवारी पार पडलेल्या उपसरपंच निवडी दरम्यान विहित मुदतीत पूनम जाधव यांचा एकमेव अर्ज उपसरपंच पदासाठी दाखल केल्याने बिनविरोध निवड केली. ग्रामसेवक विलास राबडे तर सरपंच सुमन विश्वास गुरव यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. गावच्या मूलभूत प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत नूतन उपसरपंच पूनम जाधव यांनी यावेळी व्यक्त केले.