काँग्रेसच्या टोल आंदोलनाला यश

काँग्रेसच्या टोल आंदोलनाला यश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था त्यातच सुरु असलेली टोल वसुली या विरोधात आज काँगेसच्यावतीनं टोल नाक्यांवर मोठं आंदोलन करण्यात आलं. पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील किनी टोलनाका, कराड येथील तासवडे टोलनाका, सातारा येथील आणेवाडी टोलनाका आणि पुणे येथील खेड - शिवापूर टोल नाका या चार टोलनाक्याच्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कोल्हापूर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून, शासनाच्या विरोधात जोरदार घोष घोषणाबाजी करत, परिसर दणाणून सोडला.अखेर या आंदोलनाला काही प्रमाणात यश आल आहे. 

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून आंदोलनाबाबत पत्र देण्यात आलं.  तसेच सद्यस्थितीत टोलदरामध्ये 25% सूट असून उर्वरित टोल दरामध्ये 25% सूट देण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करत असल्याची माहिती यावेळी दिली. किनी टोल नाक्याच्या वीस किलोमीटर क्षेत्रामध्ये जी गावे समाविष्ट आहेत. त्या गावातील खाजगी वाहनांना शंभर टक्के टोल माफीची सवलत देण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसच्या या आंदोलनाला यश आलं, असंच म्हणावं लागेल.