किणी येथे विवीध क्षेत्रात यश मिळवलेल्याचा सत्कार

किणी येथे विवीध क्षेत्रात यश मिळवलेल्याचा सत्कार

किणी: प्रतिनिधी परशुराम घोरपडे

दि : ७ संघर्ष,कष्ट आणि त्याग यातून यश हे जीवनातील एक नवी प्रेरणादायी असते आणि यातून मिळालेली जवाबदारी ही आपली महत्वपूर्ण जबाबदारी असल्याचे सांगून स्पर्धा परीक्षेबाबत ग्रामीण विद्यार्थ्यांचा न्यून गंड दूर करणे गरजेचे आहे जेणेकरून ग्रामीण भागातील युवक - युवती शासकिय सेवेत यश मिळवतील असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे यांनी केले. किणी (तालुका हातकणंगले ) येथील आम्ही किणीकर या सामाजिक संघटनेकडून स्पर्धा परीक्षेसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या किणी येथील मान्यवरांचा गुणगौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना प्रयत्न करणाऱ्या नां यश निश्चीत असलेचे सांगत गावपातळीवर शैक्षणिक व नोकरी संदर्भातील मार्गदर्शक शिबीर आयोजन करुन युवा पिढीला दिशादर्शनाबरोबर आपत्ती काळातील आम्ही किणीकर संघटनेचे काम उल्लेखनीय असलेचे सांगीतले . तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना ॲड. एन आर पाटील यांनी युवा पिढीला दिशादर्शकाचे काम तसेच संकट काळातील मदतीचा हात देणाऱ्या आम्ही किणीकर संघटनेचे योगदान गावच्या दृष्टीने अमूल्य असलेचे सांगत त्यांना लागेल ते सहकार्य करू अशी ग्वाही दिली.

संकट काळतील मदतीचा दिलेला हात माणुसकीचे दर्शन घडवते आम्ही किणीकर संघटनेच्या वतीने राबविण्यात उपक्रम कौतुकास्पद असलेचे सांगीतले .

प्रारंभी राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक पदी नियुक्ती झाले बद्दल माधव हवालदार अविनाश घाटगे यांचा तर संतोष पवार, निखिल घोटवडे,विश्वविष्णु चाळके, सुनीता भुजुगडे, अभिजीत नाईक, योगेश सन्मुख पोलीस दलात निवड झाले बदल व दहावी बारावीसह विविध प्रकारच्या परिक्षेत उज्वल यश संपादन केलेले विद्यार्थी तसेच देश सेवा करुन आलेल्या सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर राजेंद्र पवार, पोलिस दलातील सेवा निवृत्त लक्ष्मण नाईक, मुख्याध्यापिका सुरेखा शिरोटे, अध्यापिका सरीता माळी, एम. बी. बी. एस.निट मध्ये उत्तीर्ण प्रशांत माळी,आर.बी.आय बँक मध्ये निवड झाले बद्दल कु. नंदिनी पाटील, आर्मी इंजिनीरिंग पदी निवड झाले बद्दल साहिल मणेर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्वागत व प्रास्ताविक नंदकुमार माने, यांनी केले.

उपसरपंच अशोक माळी, मुख्याध्यापक बी डी मलगुंडे, सुनील पाटील ( एम.डी ), अशोक खाडे, यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य रणजित निकम, संताजी माने , सादिक महाबरी, राजाराम पाटील वैभव कुंभार, प्रवीण खोपकर, नरेंद्र घाटगे, रघुनाथ शेळके, बंदेनवाज मुजावर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सुत्रसंचलन कुबेर पाटील यांनी केले आभार धीरज चव्हाण यांनी मानले.