HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

सर्व मिळकतधारकांना लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड देण्याचे नियोजन करा : आ. अमल महाडिक

सर्व मिळकतधारकांना लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड देण्याचे नियोजन करा : आ. अमल महाडिक

कोल्हापूर : शहराच्या उपनगरातील अनेक मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत असूनही नगर भूमापन हद्दीमध्ये समाविष्ट न झाल्यामुळे अनेक मिळकतींचे सातबारा उतारे निघतात. या सर्व मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड मिळण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करणे आवश्यक आहे. या कामी लागणारी मोजणी फी महानगरपालिका भरण्यास तयार आहे मात्र निधीची उपलब्धता नसल्यामुळे हे प्रकरण प्रलंबित राहिले होते. या संदर्भात आमदार अमल महाडिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली.

या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक शिवाजी भोसले निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रॉपर्टी कार्डच्या विषयावर विस्तृत चर्चा झाली. आमदार महाडिक यांनी महानगरपालिका हद्दीत समाविष्ट असलेल्या सर्व मिळकत धारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्या संदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना केली. नगर भूमापन करण्यासाठी आवश्यक अधिसूचना यापूर्वीच मंजूर झाली असून कोल्हापूर महानगरपालिकेने मोजणी फी भरण्यासंदर्भात अंदाजपत्रकात तरतूद करावी अशी सूचना आमदार महाडिक यांनी अतिरिक्त आयुक्त रोकडे यांना केली.

भूमी अभिलेख विभागाच्या अधीक्षकांनी दिलेल्या प्रस्तावाला महापालिका प्रशासनाने तात्काळ मान्यता देऊन आवश्यक निधी पैकी काही रक्कम एक महिन्याच्या आत वर्ग करावी असे निर्देश आमदार महाडिक यांनी दिले तसेच भूमी अभिलेख विभागाने निविदा प्रक्रिया सुरू करणेबाबत निर्देश दिले. कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील कसबा बावडा,कसबा करवीर, टेंबलाईवाडी, कळंबे तर्फ ठाणे, उजळईवाडी आणि नवे बालिंगे अशा सहा गावातील एकूण 937 सर्वे क्रमांक आणि 1782.50 हेक्टर क्षेत्राची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत वर्ष अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करावे अशा सूचना आमदार महाडिक यांनी अधीक्षकांना दिल्या. ही मोजणी पूर्ण झाल्यास चाळीस हजार मिळकत धारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. महानगरपालिका हद्दीबाहेरील सहा गावांंतही स्वामीत्व योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार महाडिक यांनी सांगितले. या बैठकीत शहरातील मिळकत धारकांच्या प्रॉपर्टी कार्डबाबत झालेल्या चर्चेनंतर लवकरच हा प्रश्न निकाली निघेल अशी आशा आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.