केआयटीच्या टिम मॅव्हेरिक्सची अनोखी शाळाभेट
कोल्हापूर (प्रतिनिधी) : केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयामध्ये मॅव्हेरिक्स हे व्यासपीठ कार्यरत आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून दरवर्षी शाळाभेट हा उपक्रम राबवला जातो.या वर्षी या व्यासपीठाने कोपार्डे येथील “श्रीराम हायस्कूल" ही शाळा निवडली होती.यामध्ये भरपूर कृतींशील कार्यक्रमांचा तसेच विविध अन्य विषयांचा समावेश होता जसे की १०वी नंतरच्या करिअर संधी, शारीरिक तथा मानसिक आरोग्य, दैनंदिन जीवनातील ताणतणावाचे व्यवस्थापण,स्वयंसुरक्षा,योगाचे महत्त्व सांगण्यात आले.
सद्याची परिस्थिती पाहता मुलींना स्वसंरक्षणाची खूप गरज आहे. हा विषय पुढे करत यावरती ‘सेल्फ डिफेन्सची’ देखील कार्यशाळा घेण्यात आली. उपक्रमाचे नेतृत्व श्रीतेज पाटील, जयेश जगतकर, प्रथमेश नवाळे आणि सायली कोष्टी यांनी केले. व्यासपीठाचे एकूण २० सदस्य प्रयत्नशील होते. तर हा उपक्रम दहावीच्या १५० विद्यार्थ्यांना लाभदायी ठरला. शाळेचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील सर, संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मॅव्हेरिक्स व्यासपीठाच्या समन्वयक प्रा. विनिता माने मॅडम यांनी उपक्रमाचे नियोजन केले. संचालक डॉ. मोहन वनरोट्टी,अध्यक्ष साजिद हुदली ,विश्वस्त सनिल कुलकर्णी, विद्यार्थी उपक्रम प्रमुख डॉ. जितेंद्र भाट, प्रा.सचिन चौगुले, प्रा.सपना बुवा यांचे मार्गदर्शन लाभले.