HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोरे अभियांत्रिकीचा विद्यार्थी संदीप भांगे राष्ट्रीय स्तरावर प्रथम

कोरे अभियांत्रिकीचा विद्यार्थी संदीप भांगे राष्ट्रीय स्तरावर प्रथम

कोल्हापूर: टीकेआयईटी (तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी) च्या संदीप भांगे याने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित "AQUEST 2025" क्विझ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत संस्थेचा आणि महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला आहे. ही स्पर्धा ISHRAE (Indian Society of Heating, Refrigerating and Air Conditioning Engineers) द्वारे बेंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आली होती.

भव्य यश आणि सन्मान

स्पर्धेत भारतभरातील अनेक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून विद्यार्थी सहभागी झाले होते. अंतिम फेरीत संपूर्ण भारतातून आठ उत्कृष्ट गटांनी सहभाग नोंदवला होता. कठीण टप्प्यांवर मात करत संदीप भांगेने अंतिम फेरीत बाजी मारली. या विजयाबरोबरच त्याला ₹50,000/- चे बक्षीस आणि Carrier या HVAC क्षेत्रातील अग्रगण्य मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे.

विजेत्याचा प्रवास – कठीण टप्प्यांवर यशस्वी विजय!

संदीपने या स्पर्धेतील यशासाठी खालील टप्प्यांवर उज्ज्वल कामगिरी केली. एक एक फेरी पूर्ण करत त्याने ही स्पर्धा पूर्ण केली. 

 प्रारंभिक पात्रता फेरी : वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर

 उपांत्यपूर्व फेरी :  तात्यासाहेब गोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी

 उपांत्य फेरी :  महाराजा सयाजीराव गायकवाड टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ, बडोदा

 राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरी : ACREX India 2025, बेंगळुरू

संस्थेचे अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव

संदीपच्या या विजयामुळे टीकेआयईटीच्या ISHRAE विद्यार्थी विभागाला राष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली आहे. वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे अध्यक्ष,  डॉ. विनयरावजी कोरे,  श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी. व्ही. व्ही. कारजिन्नी, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे  विभागप्रमुख , डॉ. पी. व्ही. मुळीक, प्रा. जी. एस. कांबळे यांनी अभिनंदन केले असून या यशाने टीकेआयईटीच्या गुणवत्तेची राष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावली आहे. प्रा. ए.एस. चव्हाण , इश्रे फॅकल्टी ऍडव्हायझर स्टूडेंट चाप्टर, यांनी मार्गदर्शक म्हणून काम पहिले.टीकेआयईटीचे संदीप भांगे याने मिळवलेल्या या अद्वितीय यशाबद्दल संपूर्ण महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.