कोल्हापूरची जागा काँग्रेसला कशी ? सतेज पाटलांनी दिलं उत्तर

कोल्हापूरची जागा काँग्रेसला कशी ? सतेज पाटलांनी दिलं उत्तर

महाविकास आघाडीच्या सर्व जागांचे वाटप झाले आहे. मात्र दोन पक्षातील गटामधील घटक पक्षांची नाराजी अजूनही दूर झाली नाहीये. सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला मिळाली. चंद्रहार पाटील तेथील उमेदवार महाविकास आघाडीने स्पष्ट केले. मात्र यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील वाद आहे. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील व विश्वजित कदम सांगलीतून निवडणूक लढविण्यास ठाम आहेत. तसेच, कोल्हापुरची जागा श्रीमंत शाहू महाराज यांच्यासाठी सोडल्यानं सांगलीवर हक्क सांगितल्याचा दावा वारंवार ठाकरे गटाकडून करण्यात आला. या वादावर आमदार सतेज पाटील यांनी यावर बोलत “शाहू महाराज उभे राहतील, त्या पक्षाला कोल्हापूरची जागा द्यायची, असा विषय होता. शाहू महाराजांनी काँग्रेसकडून उभे राहण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली, असा विषय कधीच नव्हता,” असं सांगितलं.

कोल्हापूरच्या जागेबद्दलही सतेज पाटील सांगितलं की,  “कोल्हापूरची जागा आम्ही काही भांडून घेतलेली नाही. लोकसभा मतदार संघामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे.  विधान परिषदेचे दोन आमदार तर विधानसभेचे तीन आमदार काँग्रेसचे आहेत. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडे येणे न्यायाला धरून होते. त्यांच्या उमेदवारीचा आघाडीलाच लाभ मिळणार आहे.”