आज खा. डॉ. श्रीकांत शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर - अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेले खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले.
हिंदू संस्कृतीमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवसाला विशेष महत्त्व असून या दिवशी केलेले संकल्प अक्षय म्हणजेच अटळ आणि अमर मानले जातात, म्हणूनच आजच्या या पवित्र दिवशी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आई अंबाबाईचे दर्शन घेत सर्वांना सुख,समाधान,आरोग्य लाभू देत तसेच अखंड भारत देशामध्ये शांतता,समाधान आणि वैभव नांदु दे अशी प्रार्थना केली.
यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खा. धैर्यशील माने, महाराष्ट्र राज्याचे नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.