HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

घोडावत हॅकॅथॉन स्पर्धेत पुण्याचा डंका

घोडावत हॅकॅथॉन स्पर्धेत पुण्याचा डंका

हातकणंगले (प्रतिनिधी) : अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये प्रोग्रॅमिंग कौशल्ये विकसित करण्यासाठी संजय घोडावत विद्यापीठात कॉम्पुटर ऍप्लिकेशन्स विभागाकडून राष्ट्रीय पातळीवरील हॅकॅथॉन स्पर्धेचे ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर आयोजन करण्यात आले होते. यामध्ये टिम बायनरी ब्रिगेड्स ( सी. ओ. इ. पी. पुणे) ५०,००० रु. प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक- टिम मंडे (एम. आय. टी. पुणे) ३५,०००रु.तृतीय क्रमांक टिम वेब एक्झॉर ( एस. जी. यु. अतिग्रे)२५,००० रु. बक्षीस पटकावले.

        देशभरातील विविध महाविद्यालयातील विध्यार्थी व विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला . यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वेबसाईट डेव्हलपमेंट, मोबाईल ऍप्लिकेशन्स, मशीन लेर्निंग, आणि ब्लॉकचैन तंत्रज्ञानामधील आधुनिक विषयांवर प्रोग्रामिंग चॅलेंजेस देण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी सलग ४० तास मेहनत घेऊन या चॅलेंजेसचे सोल्युशन्स सादर केले. 

     कार्यक्रमाचे उद्घाटन व बक्षीस वितरण विश्वस्त विनायक भोसले,कुलगुरू प्रो. उद्धव भोसले,कुलसचिव डॉ. विवेक कायंदे,विभागप्रमुख आणि संयोजक डॉ. चेतन एस. आरगे यांच्या हस्ते झाले. यासाठी विद्यार्थी समन्वयक दामोदर झंवर आणि टीमने कष्ट घेतले. डॉ. संदीप सुतार, सुशांत दहिवडकर, सतीश रणभिसे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.