अयोध्येतील राम मंदिरात गोळी लागून जवानाचा मृत्यू
अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विशेष सुरक्षा दलाच्या जवानाचा गोळी लागल्याने संशयास्पद मृत्यू झाला. बुधवारी पहाटे ५.२५ वाजता ही घटना घडली. शत्रुघ्न विश्वकर्मा (वय २५) असे या जवानाचे नाव आहे. घटना घडली त्यावेळी कोटेश्वर मंदिरासमोर बांधण्यात येत असलेल्या व्हीआयपी गेटजवळ शिपाई तैनात होता.
गोळी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटना घडली त्यावेळी विश्वकर्मा कोटेश्वर मंदिरासमोर व्हीआयपी गेटजवळ तैनात होते. गोळीचा आवाज ऐकून तात्काळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पोझिशन घेतली. सुरक्ष कर्मचारी प्रवेशद्वाराजवळ पोहचले तेव्हा शुत्रान विश्वकर्मा जमिनीवर पडलेला होता. त्याला रूग्णवाहिकेतून नगर ट्रॉमा सेंटरमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.