चालक दिना निमित्त चालक मालक असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे योद्धा चालक पुरस्कार उत्साह मध्ये संपन्न

चालक दिना निमित्त चालक मालक असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे योद्धा चालक पुरस्कार उत्साह मध्ये संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी

ड्रायव्हर डे निमित्त "योद्धा वाहन चालक मालक असोसिएशन महाराष्ट्र राज्य" यांच्यावतीने चालक सन्मान सोहळा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न.    कोल्हापूर जिल्ह्यातील योद्धा वाहन चालक मालक असोशियन तर्फे पहिल्यांदाच  चालकांचा सन्मान सोहळा पार पडला . योद्धा चालक-मालक संघटने च्या माध्यमातून वाहन चालक व मालक यांना येणाऱ्या अडचनी व तक्रारी  यांचे निरसन संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यांना  निवेदन देऊन  व प्रसंगी आंदोलन करून न्याय व हक्क मिळवून देण्याचं कार्य केलं जातं . यावेळी वाहन चालकांच्यासाठी व्यसन व तणाव मुक्तीसाठी मार्गदर्शन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा कोल्हापूर यांच्यातर्फे करण्यात आले. यावेळी   विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या नागरिक व महीलांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रकाश दंडगव्हाळ,  सुधीर पोळ, . सर्व योध्दा ग्रुपचे कोर कमिटीचे सर्व पदाधिकारी,  तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण पाटील मामा,  समीर सनदी,  ओमकार पाटोळे, राहुल जंगम, संजय देवकर आप्पा . पांडुरंग  नकाते,  बाजीराव जाधव,  युवराज माने, पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत डोंगळे, .तसेच होमगार्ड प्रमुख  आशाताई पाटील, तसेच सत्कारमूर्ती पुष्पलता पाटील, पोलीस दक्ष विभाग अध्यक्ष आणि शिवसेना महिला अध्यक्ष  राणी  इंगवले,  आदी उपस्थित होते.