चिमगावमधील आंगज कुटूंबियांचे समरजितसिंह घाटगे यांनी सांत्वन करत दिला आधार

चिमगावमधील आंगज कुटूंबियांचे समरजितसिंह घाटगे यांनी सांत्वन करत दिला आधार

मुरगुड प्रतिनिधी : चिमगाव(ता.कागल)येथे चार दिवसापूर्वी दोन चिमुकली गमावलेल्या रणजीत आंगज यांच्या अश्रूंचा बांध शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे सांत्वनासाठी घरी गेल्यानंतर फुटला.त्यांना धीर देत घाटगे यांनी आधार दिला.

रणजीत आंगज यांचा लहान मुलगा व मुलगी यांचे कपमधील केक खाल्याने विषबाधा होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता.तर त्यांच्या पत्नी सौ,कोमल यांनाही त्रास जाणवला होता.या कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.घाटगे यांनी आंगज कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना आधार दिला.