जकातनाके चालवले ते अदानीलाच का? कोणाच्या दबावाखाली सरकार हे काम करत आहे ? : संजय राऊत

जकातनाके चालवले ते अदानीलाच का? कोणाच्या दबावाखाली सरकार हे काम करत आहे ? : संजय राऊत

मुंबई : संपर्ण महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्यासाठीच राज्यातील सरकार गैरमार्गाने विजयी करण्यात आलं. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मोदींचा मित्र आणि यांना महाराष्ट्रातील टोलनाके यांना चालवायचे म्हणजे कोणत्या स्तरापर्यंक ओरबाडणं सुरू झालंय. विमानतळ, भाजीची दुकानं, मार्केट कमिटी, संसद, सरकार हेच चालवणार शेवटी जकात नाक्यापर्यंत लुटायला आले आहेत. त्याच्यावर आम्ही आवाज उठवायचा नाही का? देवेंद्र फडणवीस अदानींना भेटले, मला लक्षात आलं की, महाराष्ट्राचा काहीतरी लचका तुटला जात आहे. तो जकात नाक्याच्यारूपाने आम्ही पाहतो. कोण आहेत गौतम अदानी? याआधीच जकातनाके चालवले ते अदानीलाच का? कोणाच्या दबावाखाली सरकार हे काम करत आहेत? असा सवाल करत संजय राऊतांनी सरकारवर टीका केली.

केजमधील सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसा ढवळ्या अपहरण करून हत्या करण्यात आली? पुण्यामध्ये मांजरीला योगेश टिळेकर यांच्या मामांचे अपहरण केलं गेलं आणि त्यांचा मृतदेह सापडला. भाजपचे आमदार आणि पराभूत झालेले आमदार धमकी देत आहेत. गुंडांनासुद्धा शरमेने मान खाली घालणारी भाषा आहे. खासदार सोनवणेंनी बीडच्या पोलिसांना फोन केल्यावर त्यांनी उचलला नाही. खासदाराचा फोन उचलला जात नाही हे  अत्यंत गंभीर आहे. देवेंद्र फडणवीसांना अशा प्रकारे राज्य चालवणार आहात का ? असं संजय राऊत म्हणाले.