जय धर्मनाथ गणेश मंडळाचे सामाजिक उपक्रम प्रेरणादायी-सत्यजित देशमुख
इस्लामपूर (प्रतिनिधी) :जय धर्मनाथ गणेश मंडळाचे सामाजिक उपक्रम सर्वांनाच प्रेरणादायी आहेत. वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा मंडळाचा प्रयत्न स्तुत्य आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नेते मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी केले.
वाटेगाव तालुका वाळवा येथे जय धर्मनाथ गणेश मंडळाने गणेशोत्सवात विविध क्षेत्रातील उत्तम कामगिरी केलेल्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते .अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष अभिजीत मुळीक हे होते .
प्रारंभी या मंडळाच्या गणेशाची आरती सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी देशमुख पुढे म्हणाले, या मंडळाने गणपती बाप्पाची पर्यावरणपूरक मूर्ती प्रतिष्ठापना केली आहे. त्यासाठी नैसर्गिक रंगाच्या उपयोग केला आहे. भविष्यात पर्यावरणाच्या रक्षणासाठी या उपक्रमाचे अनुकरण सर्व मंडळांनी करायला हवे. या मंडळाने या माध्यमातून समाज जागृतीचे मोठे काम केले आहे. यावेळी शिराळा नगरसेवक केदार नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी दिपक रोकडे , श्रुती देसाई ,अतुल मुळीक, महालिंग राजमाने, राजकुमार पाटील,, विकास पाटील यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद के डी पाटील, हेमंत मुळीक, संकल्प जाधव युवराज, किशोर मुळीक, हणमंत मुळीक, कमलाकर औताडे, माणीक मुळीक आदी उपस्थित होते .
यावेळी प्रास्ताविक अभिजीत मुळीक यांनी केले. आभार रोहीत मुळीक यांनी मानले. सूत्रसंचलन सुरेश मुळीक यांनी केले .