जागतिक स्तरावर मोठी आव्हाने भारताला सशक्त बनावे लागेल : योगगुरु रामदेव बाबा महाराज

जागतिक स्तरावर मोठी आव्हाने भारताला सशक्त बनावे लागेल : योगगुरु रामदेव बाबा महाराज

कोल्हापूर प्रतिनिधी : संपूर्ण जग राजनैतिक, आर्थिक, सामाजिक, सामरिक संकटातून जात आहे. यामुळे जागतिक स्तरावर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. न्याय, सत्य पायदळी तुडवले जात आहे. अशा परिस्थितीत भारताला सशक्त बनावे लागेल तरच जगाला सत्याला प्रतिष्ठा मिळेल असे प्रतिपादन योगगुरु रामदेव बाबा यांनी कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

           जागतिक महिला दिनामित शनिवारी कोल्हापूरात गांधी मैदान येथे महिला पतंजली योग समितीच्या वतीने पतंजली योग समितीचे संस्थापक व योगगुरु स्वामी रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत महिला पतंजली योग समिती महासंमेलन झाले. या संमेलनानंतर रामदेव बाबा यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियांचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिपंग, उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग कधी आणि कोणता निर्णय घेतील याची शाश्वती नाही. यामुळे जगासमोर हा चिंतेचा विषय बनला असून हड़कंप निर्माण झाला आहे. संपूर्ण जग आर्थिक, राजनैतिक, सामाजिक, सामरिक संकटातून जात आहे. न्याय, सत्याला पायदडी तुडवल जात आहे. धार्मिक उन्मादाचा आतंकवाद सुरु आहे. अशा परिस्थितीत भारताला सर्व बाबतीत सशक्त बनावे लागेल. तरच जगाशी सामना करता येईल, कोल्हापूर दरडोई उत्पन्नात यापूर्वी देशात पुढे होते. आता दोन.नंबर वर आले आहे आता यासाठी आणखी कष्ट करावे लागतील.

अमेरिका जगात अर्थिक दहशतवाद पसरवत आहे कधीपर्यंत जग अमेरिकेची गुलामगिरी करत राहणार असा प्रश्न उपस्थित करत भारताला स्वयं शक्तीशाली बनावे लागेल. देशात चुकीचा इतिहास शिकवला जात असून खरा इतिहास सांगण्याची गरज आहे. शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार झाला पाहिजे. पतंजलीच्या उत्पादनावर बंदी नसून बदनामीचे षडयंत्र रचले जात असल्याचे रामदेव बाबा म्हणाले.देशात महिलांवरील वाढलेल्या अत्याचाराबद्दल बोलताना रामदेव बाबा यांनी महिलांना स्वतःच्या रक्षणासाठी सिध्द व्हावे लागेल, पण समाजाने महिला मुलीकडे आदराने बघितले पाहिजे असे नमूद केले.