भाजपच्या जुन्या कार्यालयात सुभाष वोरांच्या नावे अभ्यासिका

भाजपच्या जुन्या कार्यालयात सुभाष वोरांच्या नावे अभ्यासिका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपच्या बिंदू चौकातील जुन्या कार्यालयात आता विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून सुभाष वोरा यांच्या नावे अभ्यासिका सुरू करण्यात आली. अभ्यासिकेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर करवीर नगर वाचन मंदिरच्या सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष अशी दमदार राजकीय आणि सामाजिक वाटचाल करणारे माजी नगरसेवक वोरा यांच्या नावे मोफत अभ्यासिका सुरू करण्याची संकल्पना मंत्री पाटील यांनी मांडली आणि ती अंमलातही आणली. यामध्ये ३४ जणांना अभ्यास करता येणार असून, त्यांना स्पर्धा पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

मंत्री पाटील म्हणाले, संघ परिवारात वाढलेल्या वोरा यांच्याकडे पराकोटीची निष्ठा होती. त्यांनी कधीही तत्त्वाशी तडजोड केली नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नव्या पिढीला यासाठीच ही अभ्यासिका सुरू करण्यात वोरा यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी व्हावे, आलीय. त्यातून देशाला चांगले प्रशासकीय अधिकारी मिळतील. यावेळी मिश्रीलाल जाजू, उदय सांगवडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, प्रफुल्ल जोशी, विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, आशा वोरा, प्रा. जयंत पाटील, हेमंत आराध्ये, संगीता खाडे, विराज चिखलीकर, अमर साठे, संपतराव पवार, राजाराम शिपुगडे, दिलीप मैत्राणी, समीर नदाफ, अॅड. संगीता तांबे, विद्याप्रबोधिनीचे कार्यकर्ते उपस्थित होते.