महागाईपासून नागरिकांना मिळणार दिलासा... केंद्र सरकारची २५ रुपये किलो तांदूळ विक्री !
केंद्र सरकार भारत ब्रँडअंतर्गत तांदूळ २५ रुपये किलो दराने विकणार आहे. तांदळाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सध्या तांदळाची सरासरी किंमत ४३ रुपये किलो आहे. त्यामुळे या महागाईत नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भारत बैंड तांदळाची विक्री नाफेड, राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि केंद्रीय संस्थांद्वारे केली जाणार आहे. सरकारने या तांदळाची योग्यरीत्या विक्री व्हावी, यासाठी विशेष उपाययोजना केली आहे. यापूर्वी या डाळीची आणि पीठाचीही विक्री सुरू करण्यात आली आहे.व्यापाऱ्यांना केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या भावांबाबत व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. सरकार तांदूळ २५ रुपये किलोने उपलब्ध करून देत आहे. मात्र, तरीही तांदळाचे भाव वाढत चालले आहेत. त्यामुळे तांदळाचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, त्यामुळे तांदळाचा साठा करून कृत्रिम भाववाढ करणाऱ्यांवर आळा घालता येणार आहे.