जिल्ह्यातील इतके बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.78 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील- चिंचोली व माणगांव, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली असे 14 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 2.78 टीएमसी, तुळशी 1.40 टीएमसी, वारणा 12.74 टीएमसी, दूधगंगा 5.10 टीएमसी, कासारी 0.98 टीएमसी, कडवी 1.33 टीएमसी, कुंभी 0.93 टीएमसी, पाटगाव 1.72 टीएमसी, चिकोत्रा 0.51 टीएमसी, चित्री 0.63 टीएमसी, जंगमहट्टी 0.54 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.65 टीएमसी, आंबेआहोळ 0.90 टीएमसी, सर्फनाला 0.08 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.12 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 21.11 फूट, सुर्वे 22 फूट, रुई 50 फूट, इचलकरंजी 47.8 फूट, तेरवाड 44 फूट, शिरोळ 33 फूट, नृसिंहवाडी 26 फूट, राजापूर 16.3 फूट तर नजीकच्या सांगली 9.9 फूट व अंकली 11 फूट अशी आहे.