HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

इचलकरंजी (प्रतिनिधी) - डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील ३० हून अधिक विद्यार्थ्यांची विविध नामांकीत कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागास नुकतेच एनबीएचे मानांकन मिळाले असल्यामुळे त्याचा सकारात्मक प्रभाव  अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता सुधारण्यावर झाला आहे तसेच डीकेटीईच्या सिव्हील विभाग व इंडस्ट्री यांचे चांगले हितसंबध असल्यामुळे सिव्हील विभागातील प्लेसमेंट हे शंभर टक्के होत आहेत.

इंडोव्हन्स प्रा.लि., अजायिल व्हेनचर्स, प्लॅनेज कन्सलटंट, रोहन बिल्डर्स, एस.जे.कॉन्ट्रॅक्टस, अपर्णा इंटरप्रायझेस अशा नामांकित कंपनीमध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर शासकीय नोकरीमध्ये देखील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सिव्हील अभियांत्रिकी चा अभ्यासक्रम तयार करताना विद्यार्थ्यांना अद्यायावत सॉफ्टवेअर्स तसेच कॉम्प्युटर प्रोग्रामिंग भाषांचे ज्ञान मिळेल अशा पध्दतीने सारासार विचार करण्यात आला आहे.

उद्योग जगतातील गरजा ओळखून, डीकेटीईने अत्याधुनिक सॉफटवेअर्स, कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग भाषांचे प्रशिक्षण आणि आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन असलेले विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहेत. फक्त बांधकाम नव्हे, तर शासकीय सेवेत देखील सिव्हील विद्यार्थ्यांची निवड होवू लागली आहे. विद्यार्थ्यांची टेक्नीकल स्न्लि, संवाद कौशल्य आणि सॉफट स्किल वाढवण्यासाठी खास ट्रेनिंग प्रोग्रॅम अयोजित केले जातात ज्यामुळे त्यांच्या प्लेसमेंटला अधिक बळकटी मिळते.

या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल.एस.अडमुठे, सिव्हील विभागप्रमुख प्रा. ए.एल.मुल्ला, टीपीओ जी.एस. जोशी, कोऑर्डिनेटर प्रा. व्ही. डी. साखरे यांचे मार्गदर्शन लाभले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.