डी. वाय. पाटील आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामाचे सोमवारपासून प्रदर्शन

कोल्हापूर प्रतिनिधी : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर कसबा बावडा व कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, तळसंदे येथील विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १२ मार्च कालावधीत दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हे प्रदर्शन होणार आहे.
प्रदर्शनाचे उदघाटन सोमवार दि. १० मार्च रोजी सकाळी १० वाजता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, कोल्हापूर सेंटरच्या अध्यक्षा आर्कि. संगिता भांबुरे यांच्या हस्ते होणार आहे. बुधवार दि १२ मार्च रोजी माजी विद्यार्थी आर्कि. महेश डोईफोडे, कोल्हापूर व आर्कि. मिलिंद दातार, बंगलोर यांचा विद्यार्थ्यांसाठी सेमिनार आयोजित करण्यात आला आहे.
प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या आर्किटेक्चरल डिझाईन, बिल्डिंग कंस्ट्रक्शन, ग्राफिक्स , इंटिरियर डिझाईन, अर्बन डिझाईन,तसेच अंतिम वर्षातील आर्किटेक्चरल प्रोजेक्ट इ. विषयांचे ड्रॉईन्ग्स व मॉडेल्स मांडण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांचे अनेक उपक्रम व छंद देखील यावेळी मांडण्यात येणार आहेत. ३D प्रिंटरद्वारे केलेल्या मॉडेल्स व कलाकृतीचा आर्किटेक्चरल डिझाईनमध्ये वापर, अद्ययावत सॉफ्टवेअर्सचा वापर करून कलात्मक व नाविन्यपूर्ण डिझाइन्स व प्रोजेक्ट सादर केले आहे.
सदर प्रदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचाही प्रदर्शन आणि व्याख्यान यामध्ये सहभाग असणार आहे. तरी सर्व विद्यार्थी, पालक व आर्किटेक्चरच्या प्रथम वर्षात प्रवेेश घेऊ इच्छिणारे बारावीचे विद्यार्थी यानी याचा लाभ घ्यावा असे महाविद्यालयातर्फे आवाहन करण्यात आले आहे.