नागरिकांनी शाश्वत आणि नियंत्रण स्वच्छतेसाठी प्रयत्न करावेत - सीईओ एस. कार्तिकेयन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वच्छता ही सेवा (SHS) मोहिम 2024 17 सप्टेंबर 2024 ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत जिल्हयात राबविणेत येत आहे. या कालावधीत स्वच्छतेमध्ये लोकसहभाग आणि लोकचळवळ निर्माण करणेसाठी विविध उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविणेत येत आहेत. यासाठी आज जिल्हयातील सर्व गावांमध्ये एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी – महाश्रमदान उपक्रम आयोजीत करणेत आला होता. ग्रामपंचायत उजळाईवाडी, तालुका करवीर येथे या उपक्रमाचा शुभारंभ प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्तिकेयन एस. जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या हस्ते करणेत आला.यावेळी उजळाईवाडी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच उत्तम अंबवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वच्छता हि सेवा हा श्रमदान पंधरावडा म्हणुन साजरा न करता जिल्हयातील सर्व गावांनी आणि नागरीकांनी शाश्वत आणि निरंतर स्वच्छतेसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी यावेळी केले.तसेच गावामध्ये कायम साचलेला कचरा असणारी, Legacy Waste Sites ठिकाणे निश्चित करुन या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविणेची सुचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.
स्वच्छता हि सेवा या मोहिमेअंतर्गत स्वच्छतेत लोकसहभाग वाढवीणे, जनजागृती करणे, गावातील कचरा असणारी ठिकाणे निश्चित करुन स्वच्छता करणे, तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, शासकीय इमारती, धार्मिक स्थळे , पर्यंटन स्थळे, तलाव परिसर, मैदाने, शाळा परिसर, गड किल्ले, पाण्याचे स्त्रोत, नदी किनारे यासारख्या ठिकाणी ही स्वच्छता मोहिम राबविणे येणार आहे.
या उपक्रमाशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या पंधरवडयात विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत.
यामध्ये ग्रामीण भागातील कुटुंबांना ग्रामपंचायती मार्फत 1 लाख कापडी पिशवीचे वाटप करणेत येणार आहे. शालेय विद्यार्थांसाठी स्पर्धाचे आयोजन करणे यामध्ये प्लस्टीक ब्रिक्स तयार करणे, टाकाऊ कच-या पासुन टिकाऊ वस्तुची निर्मिती करणे हे उपक्रम राबविणेत येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा समन्वयक तथा प्रकल्प संचालक माधुरी परीट यांनी यावेळी दिली.
एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी या महाश्रमदान उपक्रमात ग्रामपंचायत उजळाईवाडी येथे विविध उपक्रम राबविणेत आले. यामध्ये गावातुन स्वच्छतेची प्रभात फेरी काढण्यात आली. स्वच्छता प्रतिज्ञा घेणेत आली, गावची स्वच्छता करणा-या सफाई कर्मचा-यांचा सत्कार करणेत आला.
शाळेच्या परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करणेत आले. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता श्रमदान मोहिम राबविणेत आली. या मोहिमेमध्ये गट विकास अधिकारी विजय यादव, पंचायत समिती करवीर अधिकारी, कर्मचारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी सरदार दिंडे, ग्रामपंचायत सदस्य,स्वच्छता कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थ्यी आणि ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले.