डी. वाय. पाटील हॉस्पिटल राज्यातील रुग्णालयांसाठी रोल मॉडेल - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

डी. वाय. पाटील हॉस्पिटल राज्यातील रुग्णालयांसाठी रोल मॉडेल   - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटल हे राज्यातील सर्व धर्मादाय, खाजगी आणि शासकीय खाजगी हॉस्पिटलसाठी एक ' रोल मॉडेल'' आहे. सर्व सामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार व सुविधा माफक किमतीत देण्याचा डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज, नूतनीकरण केलेल्या आर्थोपेडिक वॉर्डचे उद्घाटन आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या हस्ते झाले.

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी हॉस्पिटलच्या विविध विभागांना भेट देऊन उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. हॉस्पिटलच्या सिम्युलेशन लॅबचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, "डी वाय पाटील हॉस्पिटल मधील स्वच्छता, उपचार पद्धती, तज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मिळणारी वागणूक या सर्वच गोष्टी अतिशय कौतुकास्पद आहेत. या हॉस्पिटलमध्ये मिळणारी सेवा व कार्यपद्धती ही राज्यातील सर्व रुग्णालयांसाठी रोल मॉडेल आहे.

ते पुढे म्हणाले, हॉस्पिटलच्या अत्याधुनिक ऑर्थोपेडिक वार्डमुळे कोल्हापूर आसपासच्या परिसरातील लोकांना हाडासंबंधीच्या सर्व विकारावर अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत. हा विभाग कोल्हापूरच्या आरोग्य सेवेतील एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

कुलपती डॉ. संजय पाटील म्हणाले, डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सातत्याने गुणवत्तापूर्ण सेवा देत आहोत. नव्या ऑर्थोपेडिक वॉर्डमुळे रुग्णांना हाडासंबंधी विकारांवर अतिशय जलद, कार्यक्षमपणे आधुनिक उपचार मिळणार आहेत.

विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, "डी. वाय. पाटील हॉस्पिटल ही समाजासाठी समर्पित संस्था आहे. दर्जेदार आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.

विश्वस्त पृथ्वीराज पाटील म्हणाले, रुग्णांसाठीच्या सुविधा आणि सर्वोत्तम उपचार याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. हा आर्थोपेडिक वॉर्ड आरोग्य सेवेतील नवा मापदंड बनेल.

कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा म्हणाले, "वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवा या दोन्ही क्षेत्रात संस्थेने सातत्यपूर्ण गुणवत्ता राखली आहे. हा वॉर्ड म्हणजे संस्थेच्या दूरदृष्टीचा एक उत्तम नमुना आहे.

वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड हॉस्पिटलमधील विविध सुविधांची तर ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप पाटील यांनी विभागातील उपलब्ध सुविधांची माहिती दिली. 

यावेळी कुलसचिव डॉ. व्हि.व्हि भोसले, आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा, डॉ. सलीम लाड, उपकूलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशील इंगळे यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, उप अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, ऑर्थोपेडिक विभाग प्रमुख डॉ. प्रदीप पाटील यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.