HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणी

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबईतर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी केलेल्या शैक्षणिक आवेक्षणानंतर कसबा बावड्यातील रौप्यमहोत्सवी डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' ही श्रेणी जाहीर झाली. यामुळे या पॉलिटेक्निकची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबईच्या तज्ज्ञ समितीने पॉलिटेक्निकला भेट देऊन तपासणी केली होती. यामध्ये पॉलीटेक्निकच्या विविध विभागांच्या कामाची सविस्तर माहिती घेऊन कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये दैनंदिन शैक्षणिक कामकाज, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योगांशी समन्वय,राबविलेले जाणारे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांचा सहभाग, आदी बाबींचा आढावा घेतला होता.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी, प्रकल्प सादरीकरण, त्याचबरोबर विविध कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या झालेल्या निवडीची तपशीलवार माहिती पाहिली होती. या सर्व क्षेत्रात पॉलिटेक्निकने अत्यंत चांगली कामगिरी केली असल्यामुळे पॉलीटेक्निकला व्हेरी गुड ही श्रेणी प्राप्त झाली आहे.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील,उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आ ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक ए. के. गुप्ता , सीएचआरओ श्रीलेखा साटम यांनी सर्व स्टाफचे अभिनंदन केले. 

यासाठी प्राचार्य डॉ. नरके, उपप्राचार्य नितीन माळी,रजिस्ट्रार प्रा.प्रा.महेश रेणके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा.अजय बंगडे, प्रा. पी .के.शिंदे,प्रा.अक्षय करपे, प्रा.एस. बी. शिंदे, प्रा. शितल साळोखे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.