HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणी

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या सर्व शाखांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून (एम. एस. बी. टी. ई.) 'व्हेरी गुड' ही श्रेणी प्राप्त झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मध्ये झालेल्या अकॅडमीक मॉनिटरिंगनुसार ही श्रेणी मिळाली आहे. ही श्रेणी मिळालेल्या शाखांमध्ये मेकॅनिकल,कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखांचा समावेश आहे.

वर्षभरातील शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांचे परीक्षांमधील निकाल, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम, उद्योग क्षेत्राबरोबर केलेले सामंजस्य करार आणि शिक्षकांसाठी राबविलेले प्रोत्साहनपर व संशोधनात्मक कार्यक्रम आदी बाबींची तपासणी एम.एस. बी. टी. ई. तज्ज्ञांच्या समितीकडून केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार पॉलिटेक्निकला ही श्रेणी मिळाली आहे. 'हिरकणी मंच' च्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी राबविलेले वैविध्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही दखल घेण्यात आली. 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए . के.गुप्ता यांनी सर्व स्टाफचे अभिनंदन केले.

यासाठी प्राचार्य डॉ.महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके , विभाग प्रमुख डॉ.पी.के.शिंदे, प्रा.एस.बी.शिंदे, प्रा.अक्षय करपे, प्रा.शीतल साळोखे तसेच सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.