HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा डंका!

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा डंका!

कोल्हापूर -  डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा सन २०२४-२५ मध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई डे बोर्डिंग मधील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उज्वल केले आहे. मुंबई येथे नुकताच या स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला. विज्ञान व संशोधन क्षेत्रात विद्यार्थ्यांचा गाढा रस निर्माण करणाऱ्या या नामवंत परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी पदकांची कमाई केली.

या परीक्षेत नमन फुलारी याने उल्लेखनीय यश मिळवत सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर उज्ज्वल पटेल, आदित्य पाटील, आणि स्कंद देशपांडे या विद्यार्थ्यांनी रौप्यपदक मिळवत विज्ञान क्षेत्रातील आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त  विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, प्राचार्य  अस्कर अली व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ही शाळा केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन व स्पर्धात्मकता वाढवण्यावर भर देते, असे मत यावेळी संचालिका प्राचार्या सास्मिता मोहंती यांनी व्यक्त केले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.