‘गोकुळ’ तर्फे कृत्रिम रेतन सेवकांना रेतन साहित्य वाटप

‘गोकुळ’ तर्फे कृत्रिम रेतन सेवकांना रेतन साहित्य वाटप

कोल्हापूर -  कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पा. संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) सलग्न कृत्रिम रेतन सेवकांच्या वतीने दिली जाणारी सेवा अधिक कार्यक्षमपणे व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी संघाच्यावतीने कृत्रिम रेतन सेवक यांना प्रोत्साहनपर दैनंदिन वापराकरिता लागणारे रेतन साहित्याचे वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते तसेच संघाचे संचालक व अधिकारी यांच्या उपस्थितीत गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे करण्यात आले.

गोकुळच्या पशुसंवर्धन विभागामार्फत १ जानेवारी २०२४ पासून संघाशी सलग्न असणाऱ्या प्राथमिक दूध संस्थेच्या माध्यमातून २६० कृत्रिम रेतन केंद्रे कार्यरत असून जिल्ह्यातील सर्व जनावरांसाठी सुधारित कृत्रिम रेतन सेवेचे धोरण संघाने अवलंबले आहे. दूध उत्पादक शेतकरी यांना रुपये ५० प्रती जनावर या फी वरती हि रेतन सेवा पुरवली जात आहे. या सेवेसाठी एन. डी .डी. बी, व ए. बी. एस( चितळे )कडील उच्च वंशावळीच्या वीर्य मात्रेचा वापर केला जात आहे. जिल्ह्यामध्ये संघामार्फत दरवर्षी ३ लाख जनावरांना रेतन केले जाते.कृत्रिम रेतन सेवक यांना वर्षातून एकदा बॅ‍ग,ए.आय किट (गण,कात्री,फोरसेप,थर्मामीटर व किडनी ट्रे) डिस्पोजेबल हॅन्डग्लोज असे रेतन साहित्य देण्याचे चेअरमन व संचालक मंडळ यांनी निर्णय घेतला होता त्याप्रमाणे त्यांना साहित्य वाटप करण्यात आले. त्याचा लाभ गोकुळच्या २६०कृत्रिम रेतन सेवकांना होणार आहे.

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, संघाच्या पशुसंवर्धन विभागातील कृत्रिम रेतन सेवा हा मुख्य भाग आहे. १९७८ पासून संघामार्फत प्रशिक्षण देवून कृत्रिम रेतन सेवा सुरु केली आहे. २६० कृत्रिम रेतन सेवक संघासाठी काम करत आहेत. गोकुळचा दूध वाढ कृती कार्यक्रम अंतर्गत २० लाख लिटर दूध संकलन टप्पा पार करण्यासाठी कृत्रिम रेतन सेवक महत्त्वाचा घटक आहे. कृत्रिम रेतन सेवकांनी आपले काम अधिक कार्यक्षमपणे व गुणवत्तापूर्ण करणे गरजचे असून संघाच्या विविध सेवा सुविधा जास्ती जास्त दूध उत्पादकां पर्यंत पोहोचवून संघाच्या दूध वाढीसाठी प्रयत्नशील रहावे असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी कृत्रिम रेतन सेवकांनी रेतन किट दिलेबद्दल संघाचे आभार मानले व आम्ही आमचे काम प्रामणिक पणे करून दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. यावेळी स्वागत डॉ. प्रकाश साळुंके व केले.आभार डॉ. दयावर्धन कामत यांनी मानले.

यावेळी संचालक नंदकुमार ढेंगे, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, डॉ. प्रकाश दळवी, कृत्रिम रेतन सेवक संजय डोंगळे, विराज शिंदे, शितल शेटे, सुभाष जोशी, प्रमोद पाटील व संघाचे सर्व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.