दुधगंगा धरण व्यवस्थापनकडून सतर्कतेचा इशारा

दुधगंगा धरण व्यवस्थापनकडून  सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दूधगंगा धरणाच्या पाणलोट  क्षेत्रामध्ये  जोरदार पाऊस सुरू असून जलाशय परिचलन सूची प्रमाणे पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी व धरण सुरक्षिततेसाठी  आज दिनांक 30/07/2024 रोजी सकाळी 10.00 वाजता धरण सांडव्यावरून 7600 cusec व विद्युत ग्रहातून 1500 cusec विसर्ग असा एकूण 9100 cusec विसर्ग सुरू करण्यात येणार आहे तसेच आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.