पाडव्याच्या मुहूर्तावर शिखर शिंगणापूर मार्गे दहिवडी लातूर बससेवा सुरु

पाडव्याच्या मुहूर्तावर शिखर शिंगणापूर मार्गे दहिवडी लातूर बससेवा सुरु

हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून नागरिकांसाठी शिखर शिंगणापूर मार्गे दहिवडी लातूर अशी नवीन बस सुरू करण्यात आलीये. त्यामुळे शिखर शिंगणापूर मार्गे दहिवडी,लातूर हा प्रवास आता प्रवाश्यांसाठी सुखकर ठरणार आहे. या बससेवेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांसाठी ये जा करणं सोयीचं असणार आहे. गेले कित्येक दिवस यामार्गे महामंडळाची बससेवा सुरळीत नव्हती. त्यामुळे अनेकवेळा एस. टी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे चांगलेच हाल होत होते. याची दखल घेत दहिवडी आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांच्या संकल्पनेतून व मानवाधिकार पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जयकुमार मोरे यांच्या सहकार्याने ही नवीन बससेवा गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर सुरु करण्यात आली.

 वाहतूक नियंत्रक शिखर शिंगणापूर बी बी कुदळे,आर एस शेंडे, एसटी वाहक महादेव शिंदे, प्रवीण पाटील, बाबुराव खाडे, प्रल्हाद कबाडे, चालक दत्तात्रय शिंदे व शिखर शिंगणापूर सामाजिक कार्यकर्ते धनाजी भोसले दताञय काळेल, आदिनाथ कदम यांच्या पुढाकारातून बस सेवा चालू झाल्यामुळे शिखर शिंगणापूर येथील ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापक यांचे मनःपूर्वक आभार मानले.