पुण्यातील 'त्या' घटनेवर रुपाली चाकणकरांनी दिली प्रतिक्रिया

पुणे - पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी योग्य वेळेत उपचार न झाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या घटनेवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
रूपाली चाकणकर म्हणाल्या, मंगेशकर रुग्णालयाने उपचार देण्यास टाळाटाळ केली. रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी जो अहवाल सादर केला त्यात त्यांनी पेशंटच्या गोपनीय गोष्टी जाहीर केल्या आहेत हे अत्यंत चुकीचं असून रुग्णालयाने ज्या गोष्टी समिती समोर मांडायला हव्या होत्या त्या त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या आहेत.
चाकणकर पुढे म्हणाल्या, आज राज्य महिला आयोगाच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक बोलावली असून डॉ. राधाकिसन पवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 सद्यसीय समिती आहे तिथे अहवाल सादर केला जाईल. त्या ठिकाणी पोलीस आयुक्तदेखील असतील. यावेळी पोलिसांनी नोंदवलेला जबाब पत्रकार परिषदेत मांडणार असल्याचही चाकणकर म्हणाल्या आहेत.