एनपीटीईएल कडून संजय घोडावत विद्यापीठाला पुरस्कार

एनपीटीईएल कडून संजय घोडावत विद्यापीठाला पुरस्कार

हातकणंगले (प्रतिनिधी) : आयआयटी बॉम्बे येथे 29 जून रोजी एनपीटीईएल (नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एन्हांस्ड लर्निंग) यांच्याकडून संजय घोडावत विद्यापीठाला यावर्षीचा  'अस्पिरंट ऍक्टिव्ह स्वयंम् एनपीटीईएल लोकल चाप्टर' पुरस्कार आयआयटी मद्रासचे प्रोफेसर अँड्रू थंगराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.समन्वयक प्रा. निलेश सबनीस यांनी तो स्वीकारला. यावेळी भारती बालाजी हेड ऑपरेशन आयआयटी मद्रास, प्रो.नंदिता माधवन आयआयटी बॉम्बे उपस्थित होत्या.

घोडावत विद्यापीठात  2016 पासून स्थानिक पातळीवर एनपीटीईएल स्वयंम् पोर्टलद्वारे चालवण्यात येणारे ऑनलाइन शैक्षणिक प्रमाणपत्र कोर्सेस सुरू आहेत. यावर्षी 400 शिक्षक व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. यातील यश खाडे, पिनाज शेख, शशिकांत उपाध्ये, प्रथमेश खेडकर यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. तर आदिती क्षीरसागर, मनोज मंगोरे टॉपर आले. क्रियाशील स्थानिक विभाग म्हणून दरवर्षी संजय घोडावत विद्यापीठ एनपीटीईएल च्या यादीमध्ये असते.

    या पुरस्काराबद्दल चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, सर्व डीन, डिरेक्टर्स यांनी प्राध्यापक सबनीस व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.