पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना आ. ऋतुराज पाटील यांचा मदतीचा हात

पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना आ. ऋतुराज पाटील यांचा मदतीचा हात

कोल्हापूर (प्रतिनिधी) पावसामुळे नुकसान झालेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील कुटुंबांसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाना आमदार पाटील यांच्याकडून आर्थिक सहाय्य आणि 10 दिवस पुरेल असा जीवनावश्यक वस्तूंचा शिधा देण्यात आला.

    काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील अनेक घरांची पडझड झाली. पावसामुळे प्रापंचिक वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे. इस्पूर्ली, उचगाव, कणेरी, कावणे, खेबवडे, गिरगाव, चुये, दऱ्याचे वडगाव, दिंडनेर्ली, नागाव, निगवे खालसा, नेर्ली, वडकशिवाले, सांगवडे, हणबरवाडी, हलसवडे या 16 गावातील 36 नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक सहाय्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचा शिधा देण्यात आला. मंगळवारी गिरगाव येथील एका कुटुंबाला आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली.

  यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील पाटील म्हणाले, पावसामुळे माझ्या मतदार संघातील अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाची मदत या लोकांपर्यंत कधी पोहोचणार हे माहीत नाही, अशी परिस्थिती असताना आम्ही नुकसानग्रस्त लोकांना आधार देण्यासाठी स्वखर्चातून पुढाकार घेतला आहे. या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्याना आर्थिक सहाय्य आणि 10 दिवस पुरेल असा शिधा आम्ही दिला आहे. त्यांचे नुकसान आपण भरून काढू शकत नसलो तरी या लोकाना आधार देण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून केला आहे.

यावेळी सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच उत्तम पाटील नवाळे, माजी सरपंच दिलीप जाधव,माजी सैनिक संघटना अध्यक्ष रघुनाथ पाटील, ग्रा.पं. सदस्य उत्तम बापू पाटील, संतोष सुतार, अनिल सावंत, शशिकांत साळोखे, निवृत्ती पवार, अभिजीत देठे आदी उपस्थित होते.