बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचे निधन

बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचे निधन

बिद्र (प्रतिनिधी) : बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे बोरवडे तालुका कागल यांचे निधन झाले. आज (शनिवारी) सायंकाळी अल्पशा आजारांन त्यांची प्राणज्योत मालवली ते 65 वर्षांचे होते. कागल पंचायत समितीमध्ये ते सलग पाच वर्ष उपसभापती होते.

   बोरवडे येथील दूध संस्था, सेवा संस्था, पत संस्था, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक होते. 2002 मध्ये महाराष्ट्रातील पहिले ग्रामसचिवालय बोरवडे येथे त्यांनी उभारलं. माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांचे ते वडील होत. तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे ते विश्वासू कार्यकर्ते होते.