‘पुष्पा २’ चे ओटीटीवरही राज्य, मिळवले 'इतके' व्ह्यूज

‘पुष्पा २’ चे ओटीटीवरही राज्य, मिळवले  'इतके'  व्ह्यूज

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच, अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ येथेही आपली जादू दाखवू लागला आहे. हा चित्रपट जागतिक स्तरावर आपली छाप पाडत आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर, पुष्पाने आता ओटीटीवरही राज्य करायला सुरुवात केली आहे. हा चित्रपट पाश्चात्य प्रेक्षकांवर मोठा प्रभाव पाडत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. तसेच आता या चित्रपटाचो क्रेझ ओटीटीवरही पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने मोठा रेकॉर्ड मोडला आहे.

अवघ्या चार दिवसांतच पाश्चात्य प्रेक्षकांवर प्रभाव 

ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच ‘पुष्पा २’ ने पाश्चात्य प्रेक्षकांवर खोलवर प्रभाव पाडला. हा चित्रपट सात देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. ‘पुष्पा २: द रुल रीलोडेड व्हर्जन’ ने दुसरे स्थान कायम ठेवले आहे, चार दिवसांत जागतिक इंग्रजी नसलेल्या श्रेणीमध्ये ५.८ दशलक्ष व्ह्यूज मिळवले आहेत. या चित्रपटाला चाहते ओटीटीवरही चांगला प्रतिसाद देत आहेत.

चित्रपटात  तगडी स्टारकास्ट 

अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात रश्मिका मंदान्ना अल्लू अर्जुनच्या प्रेयसीची भूमिका साकारत आहे. तर फहाद फासिल नकारात्मक भूमिकेत जबरदस्त अभिनय करताना दिसत आहे. इतर कलाकारांमध्ये जगपती बाबू, राव रमेश, अनसूया भारद्वाज, सुनील आणि इतर कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ घातली आहे.