पृथ्वी मोरे यांचा वाढदिवस उत्साहात

पृथ्वी मोरे यांचा वाढदिवस उत्साहात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासन अधिकारी पृथ्वी अजित मोरे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला. न्यू शाहूपुरी कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा.जयकुमार देसाई, अंजली देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलत देसाई ,चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, माजी नगरसेवक अजित मोरे, अजितराव मोहिते यांच्यासह सर्व देसाई,मोरे व मोहिते परिवार तसेच विविध संस्थांचे, मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.