अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकरचा व्हिडिओ व्हायरल , परंतु अजूनही तो पोलिसांना सापडला नाही!

कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बाबत अपमानास्पद वक्तव्य करून फरार झाला होता.आता नागपूरच्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूरमध्ये दाखल गुन्ह्यात अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून त्याने माफी मागितलेली नाही. मात्र, शिवाजी महाराजांचे कौतुक केले आहे.
काय म्हणाला कोरटकर ?
प्रशांत कोरटकर व्हिडिओत म्हणतो की, छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे महाराष्ट्राला जगभरात ओळखले जाते. त्यांच्या कथा ऐकून लहानाचे मोठा झालो आहे. त्यांच्या कथा अजूनही प्रेरणा देतात. छत्रपतीची राजधानी असलेला रायगडला अनेकदा भेट दिली व नतमस्तक झालो. त्यांना मी मानाचा मुजरा करतो असे कोरटकर म्हणताना दिसून येत आहे.
कोरटकरला शोधण्यास अजूनही पोलिस अपयशी
प्रशांत कोरटकर हा व्हिडिओ व्हायरल करून प्रतिक्रिया देत असताना पोलिसांना मात्र अजून सापडलेला नाही. तो पोलिसांना अजूनही का सापडत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे प्रशांत कोरटकर मुद्यावरून आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांनी प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशात लपल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी सुद्धा गुन्हा दाखल होताच प्रशांत कोरटकर बालाघाटला पळाल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असला, तरी अजून सापडलेला नाही.