कोल्हापूरात धाडसी चोरी ; सहा लाखांचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूरात धाडसी चोरी ; सहा लाखांचा मुद्देमाल  लंपास

कोल्हापुर  :  मुक्तसैनिक वसाहत परिसरातील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी  दीड लाख रुपये रोख रक्कम आणि  इतर किमती वस्तू असा सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल  लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जयकुमार जनार्दन करवडे (वय ५७, रा. श्रीकृष्ण सरस्वती अपार्टमेंट, मुक्तसैनिक वसाहत) यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी जयकुमार करवडे यांचा मुलगा खासगी नोकरी करतो. करवडे दाम्पत्य मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता मुलगीकडे इचलकरंजीला गेले होते. मुलगा राजवर्धन याची रात्रपाळीची डयुटी असल्याने मंगळवारी रात्री ११.४० वाजता तो घरातून ड्यूटीसाठी गेला. बुधवारी सकाळी ९ वाजता राजवर्धन घरी आला असता फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटलेला दिसला. त्याने आत जाऊन पाहिले असता तिजोरी फोडली होती. 

राजवर्धन यांनी तत्काळ वडिलांना घटनेची माहिती दिली. करवडे दाम्पत्य इचलकरंजीतून घरी आले. जनार्दन करवडे यांनी शाहुपूरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला.