HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

पोलिसांनीच चोरल्या अधीक्षक कार्यालयातील बॅटऱ्या

पोलिसांनीच चोरल्या अधीक्षक कार्यालयातील बॅटऱ्या

बीड : कुंपणच शेत खातं असा प्रकार बीड जिल्ह्यात घडला. पोलिस अधीक्षक कार्यालयातून तब्बल १० बॅटऱ्यांची चोरी झाली. विशेष म्हणजे या बॅटऱ्या पोलिसानेच चोरल्या. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक फौजदार व दुकानदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार बुधवारी रात्री साडे दहा वाजेच्या पूर्वी घडला. 

अधिक माहिती अशी -  अमित मधुकर सुतार (रा.खोकरमोहा ता.शिरूरकासार) व माधव गोरक्षनाथ जानकर (रा.वडगाव गुंदा ता.बीड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सुतार हे सहाय्यक फौजदार असून सध्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील वायरलेस विभागात कार्यरत आहेत. बुधवारी ते कर्तव्यावर आले. त्यांनी कोणालाही न विचारता कार्यालयातून रूमची चावी घेतली. त्यानंर वायरलेस विभागात जावून तेथील आधी तीन व नंतर सात बॅटऱ्या काढल्या.

त्या बॅटऱ्या रिक्षातून जालना रोडवरील मोहिनीराज या माधव जानकर याच्या दुकानात नेल्या. परंतू इकडे इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे त्यांनी सुतार यांचा पाठलाग केला. जानकरच्या दुकानात पोलिस अधीक्षक कार्यालयातील बॅटऱ्या दिसल्या. त्यानंतर याची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. तोपर्यंत सुतार आणि जानकर यांना ताब्यात घेतले गेले. या दोघांकडून बुधवारी रात्री सात बॅटऱ्या ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.