HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

Badlapur Crime: रिक्षाचालकाचा 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार

Badlapur Crime: रिक्षाचालकाचा 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार

बदलापूर : बदलापूरची मागील घटना अजुनही कोणाला विसरता आलेली नाही. यातच आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीनेच आधी तिला बियर पाजली आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर या मैत्रिणीच्या रिक्षाचालक मित्राने पीडितेवर अत्याचार केला.

पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी असून ती 21 डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतलं आणि या तिघांनी मद्यपान केलं. मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिली. पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला.

याप्रकरणी तिने 23 डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या 12 तासात नराधम रिक्षाचालक दत्ता जाधव याला खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या. 

आरोपी बहिणीच्या घरातील लोखंडी कपाटात बसला लपून 

पोलीस ज्यावेळेस आरोपीला  अटक करण्यासाठी गेले, त्यावेळेस पोलिसांच्या भीतीने तो बहिणीच्या घरातील लोखंडी कपाटात लपून बसला होता. मात्र पोलिसांनी अतिशय शिताफिने त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या. तर त्याच्या या कृत्यात साथ देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.