प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळताच हर्षवर्धन सपकाळ यांना राष्ट्रवादीचा झटका, 'हे' बडे नेते करणार प्रवेश

प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळताच हर्षवर्धन सपकाळ यांना राष्ट्रवादीचा झटका, 'हे' बडे  नेते  करणार प्रवेश

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षाची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांनी हाती घेताच राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांना जोरदार झटका दिला  आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या पक्षाच्या माजी आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गळ घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. काँग्रेस पक्ष पोखरायला राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुरूवात झाली आहे. कॉंग्रेस पक्षातील विधानसभेतील पराभूत माजी आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गळ घातला आहे.कॉँग्रेसचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया आणि उत्तर नांदेड विधानसभा मतदार  संघाचे काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबरडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे. 

सुरेश कुमार जेथलिया करणार अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश 

परतूर विधानसभेचे कॉंग्रेस चे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांचा उद्या अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. परतुर- मंठा मतदारसंघचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते सुरेशकुमार जेथलिया हे उद्या परतुर मध्ये सकाळी 10 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.सुरेश जेथलिया हे 2009 ते 14 या कालावधीत परतूरचे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.

मोहन हंबरडे होणार राष्ट्रवादीत दाखल 

२८ फेब्रुवारी रोजी उत्तर नांदेड विधानसभा मतदार  संघाचे काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबरडे यांचा नांदेडमध्ये अजित पवार यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात काँग्रेस पक्षातील अनेक मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश आगामी काळात होणार असं सूचक विधान केलं होतं. त्यानंतर एका मागून एक पक्ष प्रवेश होत आहेत.