बांबवडे गावात विद्यार्थ्यांचा सत्कार
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते
आव्हाने आणि संघर्ष झेलण्याची तयारी झाली की यश दूर रहात नाही. अपयश पचवून परीस्थितीची जाणिव ठेवता आली पाहिजे असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी केले. बांबवडे या ठिकाणी समर्थ सभागृहात आयोजित गुणीजन विद्यार्थी गौरव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी जयश्री जाधव उपस्थित होत्या.
प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी सदाशिव थोरात यांनी केले तसेच प्रमुख पाहूणे माजी आमदार बाबासाहेब पाटील, तहसिलदार रामलिंग चव्हाण, कोल्हापूरच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे, विक्रम पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी बापूसो चौगुले, जि.प.सदस्य विजय बोरगे, माजी गटशिक्षणाधिकारी नंदुकुमार शेळके, जिल्हा अधीक्षक उदय सरनाईक, शिक्षणविस्तार अधिकारी आनंदा पाटील, रजनी कुंभार, शिवाजी पाटील, सदाशिव कांबळे, केंद्रप्रमुख मावची, केंद्र समन्वयक राजेंद्र लाड आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी तालूक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, प्रज्ञाशोध परीक्षा, एन.एम.एम.एस. परीक्षेतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यी, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांना व मार्गदर्शक शिक्षकांचि यथोचित गौरव करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त शोभा शिवाजी पाटील यांचा सत्कार झाला. आभार रवि सुर्वे यांनी मानले, केंद्रप्रमुख, केंद्रसमन्वयक, मुख्याध्यापक, पालक उपस्थित होते.
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते