HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

प्रा. डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

प्रा. डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

शाहुवाडी तालुक्यातील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय मलकापूर- पेरीड मध्ये सांस्कृतिक विभागामार्फत सन 2023 साठी पारंपारिक वेशभूषा दिन व पाककला स्पर्धा आयोजित केली. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. भास्कर चिखलीकर यांनी प्राचार्य व उपस्थित त्यांचे स्वागत केले. सदर वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप म्हणाले की सांस्कृतिक वेशभूषेचे ज्ञानआजच्या पिढीला होणे महत्त्वाचे आहे आपली परंपरा व संस्कृती या सर्वांचा अभ्यास आजच्या पिढीसाठी उपयुक्त आहे. वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून पारंपारिक वेशभूषेचे एकूण १० गट सहभागी झाले. यामध्ये कोळी पेहराव, छत्रपती शिवाजी महाराज व मावळे, केरळी पेहराव, आदिवासी पेहराव, दक्षिण भारतीय पेहराव, धनगरी पेहराव, वारकरी पेहराव, जेलर व कैदी पेहराव व वेशभूषांचा समावेश होता. पाककला स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. यामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे एकूण ३० स्टॉल मांडण्यात आले. जसे समोसा, इडली, आप्पे, बिर्याणी, नाचणीची भाकरी, चिकन ६५ असे खाद्यपदार्थ स्टॉलमध्ये उपलब्ध होते. यामध्ये एकूण ९८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक व विद्यार्थ्यांनी सर्व पदार्थांचा आस्वाद घेतला. या स्पर्धेसाठी प्राचार्य सर्व कमिटी सदस्य शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांचे सहकार्य लाभले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.