बाळासाहेब कटारे यांची पुणे विभागीय अध्यक्षपदी निवड

बाळासाहेब कटारे यांची पुणे विभागीय अध्यक्षपदी निवड

सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ

पुणे शिक्षक भवन येथे विभागीय खाजगी प्राथमिक पदाधिकारी बैठकीत मा बाळासाहेब कटारे यांची पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली व तशी घोषणा करण्यात आली.

आपल्या अथक परिश्रमाचे आणि उच्च वैचारिक भूमिकेची आणि गतिमान चौफेर यशस्वी कार्याची विशेष दखल घेऊन पुणे विभागीय खाजगी प्राथमिक अध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली आहे . आपण प्राथमिक खाजगी संघटनेसाठी प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत आत्मविश्वासाने आपण आपल्या शैक्षणिक क्षेत्रात आजवर चौकार घोडदळ सुरू ठेवली आहे.

आपले कार्य निश्चितच गौरवास्पद आहे आदर्श समाज निर्मिती आणि जनहितार्थ आपणाकडून विधायक व शैक्षणिक क्षेत्रात यापुढे भरीव असे कार्य होईल असा माझा ठाम विश्वास आहे यापुढे आपण शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी चौफर घोडदौड कराल यात तीळ मात्र शंका नाही भविष्यातील आपल्या वैभवशाली कार्यास लाख लाख शुभेच्छा.

आदर्श आणि कर्तव्य संपन्न व्यक्तिमत्व म्हणून भावी शिक्षक आपला आदर्श घेतील सदरील सन्मानपत्र आपणास समारंभ पूर्वक खाजगी प्राथमिक पदाधिकारी बैठकीत प्रदान करण्यात आले त्याबद्दल आपले मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन.

आपल्या उज्वल दमदार आणि दिमाखदार वाटचालीस पुनश्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा.