भोगावती शिक्षणची निवडणुक दोन महिन्यात घेण्याचे आदेश

भोगावती शिक्षणची निवडणुक दोन महिन्यात घेण्याचे आदेश

कौलव प्रतिनिधी : निवास हुजरे

महाराष्ट्रातल्या सर्वाधिक म्हणजे 34000 सभासद संख्या असलेल्या कुरुकली (ता.करवीर) येथील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची निवडणुक घेणे आता अनिवार्य झाले आहे.धर्मादाय आयुक्तांनी  शिवराज नायकवडी यांना तीन महिन्याच्या आत निवडणुक घेण्याचे आदेश कोल्हापूर विभागाचे धर्मादाय उप आयुक्त प्र.म.चौधरी यांनी दिले आहेत.त्यामुळे आता भोगावती साखर कारखान्या निवडणूक अगोदर भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

    भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची मुदत दि.३ सप्टेंबर २०२१ मध्ये संपली. त्यामुळे शिक्षण मंडळाची निवडणूक घेतली जावी यासाठी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे या संस्थेचे सभासद राजू आडके,(आरे ता.करवीर) जगन्नाथ पाटील (परिते ता.करवीर),सुनील चौगले (शिरगाव ता.राधानगरी) यांनी नोव्हेंबर २१ मध्ये तक्रार दाखल केली होती.

     मात्र विद्यमान संचालक मंडळाने सुकाणू समितीला अंधारात ठेवून बोगस प्रक्रिया करत  निवडणुक प्रक्रिया झाल्याचे दाखवुन नवीन संचालक मंडळ  दाखवून नवीन संचालकांची नावे धर्मादायकडे दिली होती.महिनाभरापुर्वी स्वाभिमानीचे प्रदेश अध्यक्ष जालंदर पाटील यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय बैठक झाली. त्यावेळी शिक्षण मंडळाबाबत धर्मादाय कडे असणार्या सर्व तक्रारी मागे घेऊन निवडणुकीस सामोरे जाण्याचे ठरले.गेले दोन आठवडे स्वाभिमानीचे जालंदर पाटील यांनी सर्वांना एकत्र आणत तक्रारी मागे घेण्याचे प्रयत्न केले.

     या  तक्रारीची दखल घेऊन भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा करत असताना निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी संस्थेच्या बँक खात्यामध्ये किती रक्कम शिल्लक आहे त्याची बॅलन्स शीट पासबुक स्वतंत्र अकाउंट ही सर्व माहिती घेऊन कमिटी देखील स्थापन करण्याचे आदेश आज धर्मादाय आयुक्तांनी  कार्यालयीन अधिक्षक शिवराज नायकवडी यांना दिले आहेत. 

भोगावती शिक्षण मंडळ सभासद संख्या ३४०००, संचालक मंडळ संख्या १३शिक्षण मंडळाकडे एक हायस्कूल, जूनियर कॉलेज,सीनियर कॉलेज आणि राजश्री शाहू इंग्लिश मीडियम स्कूल चालवत आहे .