श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा ४८वा वर्धापन दिन उत्साहात

कागल प्रतिनिधी: येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा ४८वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला.
कारखान्याच्या प्रांगणातील छत्रपती शाहू महाराज,कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या पुतळ्यास व कागलाधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या प्रतिमेस कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, सर्व संचालक,संचालिका रेखा पाटील, सुजाता तोरस्कर, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह शाहू ग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी,सभासद शेतकरी,पुरवठादार,हितचिंतक,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.