मंत्री हसन मुश्रीफ यांनी खंडपीठप्रश्नी मंत्रिमंडळात उठविला आवाज

मंत्री हसन मुश्रीफ यांनी खंडपीठप्रश्नी मंत्रिमंडळात उठविला आवाज

कोल्हापूर  : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, अशी आग्रही मागणी करीत मंत्रिमंडळात आवाज उठविला. या मागणीच्या संदर्भाने मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ तातडीने व्हावे अशी आग्रही मागणी केली. 

वकील आणि जनतेतून ही मागणी जोर धरीत आहे. तसेच;  माणिकराव पाटील- चुयेकर यांनीही उपोषण सुरू केले आहे, याबाबत चर्चा केल्याचे मंत्री  मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. यावर मुख्यमंत्री  फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य सरकारने मंत्रिमंडळाचा तसा ठराव केल्याचे सांगितले. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही, खंडपीठाच्या उभारणीसाठी येणाऱ्या खर्चापोटी निधीचीही तरतूद करून ठेवण्यात आली आहे, असे स्पष्ट केले. 

त्यावर मंत्री  मुश्रीफ यांनी या प्रश्नी वास्तविक उच्च न्यायालयाने परवानगी द्यावी, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरच कोल्हापूर खंडपीठाच्या परवानगी बाबत आपण उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीना भेटून खंडपीठाबाबत पुन्हा एकदा विनंती करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, माणिक पाटील -चुयेकर यांनी कोल्हापुरात खंडपीठप्रश्नी सुरू केलेले उपोषण सोडावे, असेही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितल्याचे मंत्री  मुश्रीफ यांनी सांगितले.