पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून जिल्हा परिषदेचं अभिनंदन

कोल्हापूर - शासनाने दिलेल्या निर्देशाप्रामणे कोल्हापूर जिल्हा परिषदे अंतर्गत दिवंगत झालेल्या शासकिय कर्मचा-यांची सेवा जेष्ठता यादी तयार केली असून प्रत्येक वर्षी रिक्त झालेल्या सरळसेवेच्या विविध संवर्गाच्या पदांच्या 10% प्रमाणे पद भरती करण्याची कार्यवाही पार पडते. 2024 अखेर रिक्त असलेल्या अनुकंपा नियुक्तीसाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण असणारे 31 उमेदवार नियुक्तीस पात्र आहेत. सबंधित उमेदवारांची शैक्षणिक अर्हता व जात प्रवर्ग निहाय उपलब्ध पदांच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याचा कार्यक्रम सोमवारी 21 एप्रिल रोजी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी नाम. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेने केलेल्या कार्याबद्दल ना. आबिटकरांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) व सर्व टिमचे मनापासून अभिनंदन केले.
सध्या एम.पी.एस.सी सारख्या स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय नोकरी मिळविण्यासाठी अनेक उमेदवार वर्षानुवर्ष सातत्याने प्रयत्न करीत आहेत. यामध्ये हजारो उमेदवारांपैकी फक्त काही उमेदवारांनाच शासकीय नोकरीची संधी मिळते. तथापी तुम्हा उमेदवारांच्या पालकांची पुण्याई आणि शासन निर्णय यामुळे अनुकंपा योजनेद्वारे तुम्हा सर्वांना शासकिय नोकरीची संधी सहज उपलब्ध झाली आहे. अनुकंपा नोकरी मिळाल्यानंतर ते सेवा निवृत्त होईपर्यंत खूप चांगल्या पध्दतीने लोकांची सर्व कामे करा अशा सूचना ना. पालकमंत्री आबिटकर यांनी अनुकंपा नोकरी मिळालेल्या उमेदवारांना दिल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.कोल्हापूर, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.कोल्हापूर , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) जि.प.कोल्हापूर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.कोल्हापूर आणि अनुकंपा नियुक्तीधारक सर्व उमेदवार त्यांच्या कुटुंबीयांसह हजर होते.