जागतिक बँकेच्या निधीतून शिरोळ तालुक्यामध्ये महापुर नियंत्रणासाठी तरतूद करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - गेल्या आठवड्यपुर्वी आंदोलन अंकुश महापुर नियंत्रणासाठीजागतिक बँकेचा आलेला निधी ग्रामीण भागावर खर्च करावा यासाठी उपोषण करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पाटबंधारे विभागासोबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. महापुराची व्याप्ती कमी करण्यासाठी नद्यांच खोलीकरण ,सरळीकरण, गाळ काढणे, पुलाचे भराव काढणे इत्यादी कामे करावीत. जागतिक बँकेच्या निधीतून आपल्याकडे महापूर नियंत्रणासाठी 3200 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातील जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून जिल्ह्यामध्ये सर्वात बाधित तालुका असलेल्या शिरोळ तालुक्यातील महापूर नियंत्रणाची कामे करावीत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
त्यासाठी पाटबंधारे विभागाने सर्वे करून तात्काळ विकास आराखडा तयार करावा अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी केली.
पाटबंधारे विभागाने सर्वे चालू असून अंतिम अहवाल आल्यानंतर विकास आराखडा तयार केला जाईल असं पाटबंधारे विभागाच्या स्मिता माने यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अमोल संकपाळ पाटबंधारे अधिकारी मेहेत्रे उपस्थित होते .
महापुराच्या काळामध्ये मदतकार्य आणि पाणी व्यवस्थापन याबाबत जिल्हा व्यवस्थापनानं दक्ष राहण्याची मागणी करण्यात आली. सध्या आपल्याकडे नद्यांचे पाणी वाढलेल आहे पाण्याचा विसर्ग वाढण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या नियमानुसार कर्नाटक सरकारने हिप्परगी बैरजचे दरवाजे 15 सप्टेंबर अखेर खुले ठेवावेत. त्यासाठी आपल्या पाटबंधारे विभागाने पाठपुरावा करावा अशी सूचना जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी केली.
यावेळी गोपाळ चव्हाण, नागेश काळे, रशीद मुल्ला ,भगवान कोइगडे, आनंद भातमारे, संतोष दीक्षित यांच्यासह आदी उपस्थित होते.