महाराष्ट्रातील मोठं नाव अशोक चव्हाण यांचा राजीनामा... असा होता काँग्रेस मधील त्यांचा कार्यकाळ..

महाराष्ट्रातील मोठं नाव अशोक चव्हाण यांचा राजीनामा... असा होता काँग्रेस मधील त्यांचा कार्यकाळ..

      लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. मागील काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा व बाबा सिद्दीकी यांनी काँगेसला रामराम ठोकला. त्यांच्यानंतर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राजीनामा दिला. अशोक चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे मोठे नाव असून त्यांनी महाराष्ट्रात काँगेस पक्षाच्या जवळपास सर्वच महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली आहे.

       चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी सांगायच झालं तर ते 1987 व 2014 मध्ये लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आले. 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री होते. आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. विलासराव देशमुख सरकारमध्ये सांस्कृतिक, उदयोग, खाण मंत्री होते. 2019 साली नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून त्यांनी आमदारकी मिळवली. 2015 ते 2019 या काळात महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद ही सांभाळले, याशिवाय ते विधानपरिषदेचे सदस्यदेखील होते. 

     काँग्रेससोबतच्या सोडचिठ्ठी नंतर अशोक चव्हाण भाजप मध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली आहे. आज त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची भेट घेतली त्यामुळे चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु असल्याच दिसून येत असेल तरी चव्हाण यांनी याबाबत कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाहीये.