महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
संजय पवार / मिरज, प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ सांगली यांच्यावतीने समाजाच्या न्याय व हक्कासाठी प्रचंड सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी वडार समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
वडार समाजाच्या वतीने जातीचा दाखला व जात पडताळणीसाठी सन 1961 सालचा महसूल पुरावा मागितला जातो ती अट शिथिल करावी, पॅरामेडिकल व व्यवसायिक प्रशिक्षण कोर्सेसला फी सवलत आणि स्कॉलरशिप मिळावी, दगड फोडणाऱ्या 50 वर्षावरील महिलांना कामगारांना कल्याणकारी महामंडळाकडून दरमहा पेन्शन मिळावी, वडार वस्ती सुधारणा योजना अंमलात आणावी यांसह अनेक मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
या मोर्चामध्ये लहान मुलांपासून महिला, वृद्ध, तरुण यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे अध्यक्ष विनायक कलगुटकी यांनी संबोधित केले. आमचा वडार समाज अशिक्षित होता राहायला घरे नव्हती तर मग महसूल पुरावा येणार कुठून? त्यामुळे बऱ्याच तरुण-तरुणींना जातीचा दाखला न मिळाल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. स्टोन क्रेशरद्वारे दगडफोड होत असल्यामुळे वडार समाजातील स्त्रियांची कामे केली बंद झाली आहेत. अशा महिला कामगारांना दरमहा पेन्शन योजना सुरू करावी. यावेळी जिल्हा काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांनी या मागण्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.
त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचा वडार समाजाच्या या मोर्चाला पाठिंबा राहिल असे आश्वासन नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी दिले. माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी कष्टकरी मोलमजुरी करणाऱ्या वडार समाजाला योग्य तो न्याय मिळावा यासाठी नक्की प्रयत्न करू असे आश्वासन दिले. बीजेपीचे श्रीकांत शिंदे यांनी वडार समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले.
या मोर्चाला विनायक कलकुटगी, आशुतोष कलकुटगी,सुरेश कलकुटगी, राकेश कलकुटगी, बाळासाहेब दनोळे, राहुल सावंत, श्रीराम अलाकुंटे, दीपक वडर, गणेश साळुंखे, संतोष वडार, संदीप पवार, माजी नगरसेविका मधुरीताई कलकुटगी, सामाजिक कार्यकर्त्या संगीता वडर, अमोल धोत्रे, रवी कलकुटगी इत्यादी उपस्थित होते.